Monday, 30 July 2018
Sunday, 29 July 2018
" वाट "
इथे तूफान गर्दी माणसांची
स्वताला हरवून कसा चालेल
येईलही तो तुझा हात धरुन न्यायला
त्याची वाट पाहून कसं चालेल ?
अंधाराची रात्र येते आयुष्यात
स्वच्छ प्रकाशही येतो कधी कधी
रोज इंद्रधनुष्यच हवा
असं म्हणून कसं चालेल ?
ऋतू बदलतात नेहमीच
उन्हे झेलावी लागतात अंगावर
सावलीतून चालताना रस्ते चूकतात कधी कधी
नेहमी सावलीच हवी म्हणून कसं चालेल ?
Sunday, 22 July 2018
"सपने वो नहीं जो रात को सोने के बाद आते हैं , सपने तो वो होते हैं जो आप को सोने न दे। "
लहानपणी आपली खुप स्वप्न असतात. मला हे बनायचय , मला ते बनायचयं. "हजारों ख्वाइशें ऐसी ". अगदी सर्वांचच असं असत अस नाही. बरेच जण ठाम असतात त्यांच्या धेयावर. आता हे स्वप्नांच ध्येयामध्ये रूपांतर केव्हा होत हे मात्र कळतच नाही. ज्यांची स्वप्न आयुष्याचं ध्येय बनुन जातं ते नक्कीच पूर्ण होत आणि बाकी स्वप्न फ़क्त रात्री पडतात. आणि मग आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर आपल्याला वाटत राहतं की आपण खुप उशीर केला .आपल्या स्वप्नांसाठी आपण जागायला हवं होत. मग सुरु होते तगमग , तळमळ. आपल्याजवळ सर्वकाही असूनही आयुष्य अपूर्ण वाटायला लागतं . अजुन खुप उशीर न करता आपल्या स्वप्नांसाठी थोड़ जगायला हवं.
" IT'S NEVER TOO LATE TO CHASE YOUR DREAMS "
Sunday, 15 July 2018
गारवा
उन्हाळ्याच्या कड़क उन्हातही थंड हवेचा गारवा मिळावा तसा तो जवळुन निघून गेला. न राहवुन हळूच वाकुन पहिल, अगदी कोणाच्याही नकळत. मनात चालबिचल सुरु झाली , वाटलं सर्वजनी पाहत असतील त्याला. दोघी-तिघी पाहत होत्या त्याच्याकडे, मी आपलं ओरडून सांगितले सर्वांना "ख़बरदार जर कोणी त्याच्याकडे पाहिलं तर ,तो माझा आहे " (पण मनात )😉
Subscribe to:
Posts (Atom)
Stay Home🏡 Stay Safe
-
Sophisticated .. मोठ्यांदा खिदळन्याचा आवाज आला, आणि सर्वानी एकदाच वळून पहिल. सर्वजन 'हाउ ऐम्बर्रासिंग' अश्या अविर्भावात...
-
मुझे यकीन है अपने लफ्जों के हुनर पर..... के लोग मेरा चेहरा भूल सकते है . मेरी बातें नहीं ...... Hello all my lovely Frien...