Sunday, 29 July 2018

" वाट "

 इथे तूफान गर्दी माणसांची 
स्वताला हरवून कसा चालेल 
येईलही तो तुझा हात धरुन न्यायला 
त्याची वाट पाहून कसं चालेल ?

अंधाराची रात्र येते आयुष्यात 
स्वच्छ प्रकाशही येतो कधी कधी 
रोज इंद्रधनुष्यच हवा 
असं म्हणून कसं चालेल ?

ऋतू बदलतात नेहमीच 
उन्हे झेलावी लागतात अंगावर 
सावलीतून चालताना रस्ते चूकतात कधी कधी 
नेहमी सावलीच हवी  म्हणून कसं चालेल ?

 
 

No comments:

Post a Comment

Stay Home🏡 Stay Safe