"स्त्रित्वाचा जागर "
आज जागतिक महिला दिन. सकाळपासूनच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हं ! अगदी आमदार झाल्यासारख वाटत आहे. या दिवशी दर वर्षी खुप शुभेच्छा मिळतात. स्त्री किती महान आहे हे आज सर्वांनाच प्रकर्षाने जाणवतं. आज उगाच अभिमान वाटायला लागतो स्त्री असल्याचा. बऱ्याच जणांचा याच्या वर वादविवाद चालतो कि स्त्रीत्वाचा सन्मान एकच दिवस का करायचा ? हे पण ठीक आहे. एकाच दिवशी कोडकौतुक करुन वर्षभर " बाई ची जागा पायाशी " असे महान विचार असणारे फ़क्त पुरुषच नाही तर अनेक स्त्रीया मी पाहिल्या आहेत. एकच दिवस का? विचार तसा चांगलाच आहे.
आपल्या वाढदिवसाच्या दिवशी खरं तर आपल्या आयुष्यातून एक वर्ष कमी झालेला असतो. तरीही आपण का साजरा करतो वाढदिवस? कदाचित येणाऱ्या आयुष्यात त्याने नविन उमेद घेऊन जगावं , भुतकाळ विसरुन चांगल भविष्य घडवावं. अगदी तसेच महिलांना चल आणि मूल यापुढे जाऊन स्वताला नवनवीन क्षेत्रात आजमावण्याची प्रेरणा मिळावी, भुतकाळ सोडून देऊन येणारं आयुष्य नव्या उमेदीने जगाव म्हणून तरी हा दिवस साजरा करावा. चूल -मूल अन अख्खा संसार संभाळत, स्वत : पहिलेल स्वप्न पूर्ण करत ज्यांनी आपआपल्या क्षेत्रात कर्तुत्व गाजवलं (एक स्त्री म्हणून मला पूर्ण जाणीव आहे हे करणं सोप नाही )त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांच्या "स्त्रीत्वाचा जागर" करण्यासाठी तरी असा एक दिवस नक्की साजरा करावा.
माझ्या आयुष्यातील अनेक भूमिका मैत्रीण , गुरु , हितचिंतक ,मार्गदर्शक ती चोख बजावत असते. जिने मला हे शिकावल की " कोणावर कधी अन्याय करू नको , आणि कधी अन्याय सहनही करू नको". एक स्त्री म्हणून स्वताच अस्तित्व निर्माण करत असताना , तुझी कर्तव्य कधीच विसरु नको. जिच्यामुळे मी घडले त्या माझ्या आई ला माझा मानाचा मुजरा.!!!
माझी बहिण , मैत्रीण , गुरु , मार्गदर्शक , हितचिंतक, सहकारी अशा अनेक भूमिकेत माझ्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक स्त्रीला त्यांना मिळालेल्या "स्त्रित्वा " साठी आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खुप खुप शुभेच्छा !!!

No comments:
Post a Comment