सख्खी मैत्रीण
पूर्वा मनिषाची शेजारीण. नवीनच राहायला आली होती. दिसायला छान होती , शिवाय स्वताचा काहीतरी व्यवसाय करायची. मनीषा गृहिणी होती. अश्यात तिची तब्येत बरी नसायची , नेहमी आजारी असल्यामुळे तिला तिच्या मुलीकडे व नवरा अमित याच्या कड़े लक्ष देण शक्य होत नव्हत., पूर्वा तशी मनमिळावू असल्यामुळे त्या दोघींची मैत्री व्हायला वेळ लागला नाही. मनिषाला छानच वाटत होत तिला सोबत मिळाली. पूर्वा अणि पिहु ची पण मस्त गट्टी जमली होती. पूर्वा बाहेरून आली की आधी मनीषा कड़े जाई , चहा बनवून दोघी सोबत चहा घ्यायच्या अणि मग पूर्वा आवरण्यासाठी तिच्या रुमवर जात असे . हळूहळू पूर्वा त्या घरातील एक सदस्य बनली... सकाळच्या चहा पासून रात्रीच्या जेवनापर्यंत पूर्वा मनिषाकडेच असायची. अमित ला ऑफिस ला आवरुण देण्यापासून ते पूर्वा ला शाळेत सोडवणे आणि घेऊन येणे सर्व जबाबदारी आता पूर्वाची होती. मनीषा खुप खुश होती, पूर्वाच्या रुपाने तिला जणू बहिनच मिळाली होती. अमित अणि पिहु ला तर हक्काच मानुस मिळाल होतं.
अमित ने मनीषा ला हाक दिली :अगं माझ्या शर्ट च बटन तुटल आहे लाऊन देतेस का ?
मनीषा : पूर्वा ला सांग.
अमित : किती आळशी झाली आहेस तू !
मनीषा: हो ! झाली आहे. तुम्ही ठेवा तो शर्ट पूर्वा आल्यावर लाऊन देईल.
अमित ला मनीषा च्या अश्या वागण्याचा रागच आला. पूर्वा मात्र हे आपलच घर आहे समजून सर्वे खुप काळजीने करायची. समजून नाही , तिने हे घर आपलं मानल होत. बाकी सर्व ठीक ..... नाही... छानच चाललं होत , पण अमित मात्र हल्ली खुप चिड़चिड़ करत होता. पूर्वा एवढं सर्व करत असूनही तो तिच्याशी अजिबात व्यवस्थित बोलायचा नाही. मनीषा ला कळेच ना नमकं काय झालं आहे ते. तिने खुप खोदून खोदून विचारल तेव्हा कुठे अमित म्हणाला मला पूर्वा घरी आलेल आवडत नाही, तिला येऊ नको म्हणून सांग. आज पहिल्यांदा मनिषाला काहीतरी सहाजिक नाहीये अस वाटल. अमित ला बोलायच एक होत अणि तो बोलला वेगळच काही.
बाकी काही कळेल किंवा नाही पण स्त्रियांना एवढ नक्कीच कळत की त्याला कोणाबद्दल ओढ़ वाटत आहे. मनीषा ला हे जाणवलं नि बेचैन झाली. तिला कळेच ना की काय कराव कारण सर्वजन आपल्या आपल्या ठिकाणी बरोबर होते. कुठेतरी या सर्वाला तीच जबाबदार होती, याची तिला जाणीवही होती.चूक कोणाचीच नव्हती. मनीषा ला कळून चुकल होते किती गुंता झाला आहे. आता हे सर्व तिलाच सांभाळुन घ्यायचे होते तेही कोणाला न दुखवता. संध्याकाळी मनीषा घर आवरत होती तिचा विचार करणही चालूच होत.. तेवढ्यात पूर्वा तिथे आली. तिने विचारल, मी आवरू का? आता मनीषा बेचैन झाली , तिला पूर्वा ला स्पष्ट सांगायचे होते की हे सर्व इथेच थांबल पाहिजे गुंता वाढत जातोय पण शब्द तिची साथ देत नव्हते. तिने पूर्व ला सांगितल चहा कर, आज आपण निवांत गप्पा मारत चहा घेऊ.....
पूर्वा आणि मनीषा चहा घेत घेत गप्पा मारत होत्या. अचानक मनिषाने पूर्वा ला विचारल.... तुला अमित कसा वाटतो..? असा प्रश्न ऐकून पूर्वा खरे तर दचकलीच.! तिला काय बोलावे ते कळतच नव्हतं. तिची एकूणच भावना पाहून मनिषाला समजलच होतं , पण तिला हे व्यवस्थित हाताळायच होतं. 'पूर्वा आम्हा सर्वांनाच तू खुप आवडतेस. अमित , पिहू आणि मी..... सर्वांचीच तू लाड़की बनली आहेस. आम्हाला तर तू आमच्या घरातील सदस्य वाटतेस , तू माझी "सख्खी मैत्रीण " आहेस. मला माहित आहे तुझाही जीव आमच्यात गुंतला आहे. तुही आमच्यावर तेवढच प्रेम करतेस जेवढ आम्ही करतो. पण माझा संसार मी तुझ्या सोबत वाटू नाही शकत.' मनीषा बोलत होती आणि पूर्वा च्या डोळ्यातून अश्रु वाहत होते.... ती काहीच न बोलता तिथुन निघून गेली. मनिषाला कल्पना होती पूर्वा ला काय त्रास होत असेल पण हे सर्व वेळीच बोलण गरजेच होत. दुसऱ्या दिवशी पूर्वा घरी आली नाही तेव्हा तिने तिच्या रूमकड़े पहिल, तीच्या रूम ला कुलुप होता आणि नंतर ते पूर्वा कधी उघडणारही नव्हती.
मनीषा काय झाल याचा फ़क्त विचार करत बसली......यापुढे तिचा संसार ती स्वता सांभाळनार होती.....!

.
असा प्रश्न ऐकून मनीषा खरे तर दचकलीच.... should that असा प्रश्न ऐकून purva खरे तर दचकलीच.. and very nice articel ... keep going
ReplyDeleteहो बरोबर..आता पहा ...वा! वैभव नी पूर्ण लेख वाचला 😇....thank you!!
ReplyDeleteमनीषाचा प्रश्न जरा चुकीचा वाटला ...
ReplyDeleteka bara...!
DeleteJar amitcha purwa kde bagaycha drushtikon ch badlla nasta tar....
ReplyDeletesahawasatun bhavana badalu shakatat..... ethech tar natyancha gunta hoto
Delete