Friday, 16 March 2018

सख्खी मैत्रीण 


      पूर्वा मनिषाची शेजारीण. नवीनच राहायला आली होती. दिसायला छान होती , शिवाय स्वताचा  काहीतरी व्यवसाय करायची. मनीषा गृहिणी होती. अश्यात  तिची तब्येत बरी नसायची , नेहमी आजारी असल्यामुळे तिला तिच्या मुलीकडे व नवरा अमित याच्या कड़े लक्ष देण शक्य होत नव्हत., पूर्वा तशी मनमिळावू असल्यामुळे त्या दोघींची मैत्री व्हायला वेळ लागला नाही. मनिषाला छानच वाटत होत तिला सोबत मिळाली. पूर्वा  अणि  पिहु ची पण मस्त गट्टी जमली होती.  पूर्वा बाहेरून आली की आधी मनीषा कड़े जाई , चहा बनवून दोघी सोबत चहा घ्यायच्या अणि मग पूर्वा आवरण्यासाठी  तिच्या रुमवर जात असे . हळूहळू पूर्वा त्या घरातील एक सदस्य बनली... सकाळच्या चहा पासून रात्रीच्या जेवनापर्यंत पूर्वा मनिषाकडेच असायची. अमित ला ऑफिस ला आवरुण देण्यापासून ते पूर्वा ला शाळेत सोडवणे आणि घेऊन येणे सर्व जबाबदारी आता पूर्वाची होती. मनीषा खुप खुश होती, पूर्वाच्या रुपाने तिला जणू बहिनच मिळाली होती. अमित अणि पिहु ला तर हक्काच मानुस मिळाल होतं. 
    अमित ने मनीषा ला हाक दिली :अगं माझ्या शर्ट च बटन तुटल आहे लाऊन देतेस का ?
    मनीषा : पूर्वा ला सांग. 
    अमित : किती आळशी झाली आहेस तू !
    मनीषा: हो ! झाली आहे. तुम्ही ठेवा तो शर्ट पूर्वा आल्यावर लाऊन देईल.
अमित ला मनीषा च्या अश्या वागण्याचा रागच आला. पूर्वा मात्र हे आपलच घर आहे समजून सर्वे खुप काळजीने करायची. समजून नाही , तिने हे घर आपलं मानल होत. बाकी सर्व ठीक  ..... नाही... छानच चाललं होत , पण अमित मात्र हल्ली खुप चिड़चिड़ करत होता. पूर्वा एवढं सर्व करत असूनही तो तिच्याशी अजिबात व्यवस्थित बोलायचा नाही.  मनीषा ला कळेच ना नमकं  काय झालं आहे ते. तिने खुप खोदून खोदून विचारल तेव्हा कुठे अमित म्हणाला मला पूर्वा घरी आलेल आवडत नाही, तिला येऊ नको म्हणून सांग. आज पहिल्यांदा मनिषाला काहीतरी सहाजिक नाहीये अस वाटल. अमित ला बोलायच एक होत अणि तो बोलला वेगळच काही.  
     बाकी काही कळेल किंवा नाही पण स्त्रियांना एवढ नक्कीच कळत की त्याला कोणाबद्दल ओढ़ वाटत आहे. मनीषा ला हे जाणवलं नि बेचैन झाली. तिला कळेच ना की काय कराव कारण सर्वजन आपल्या आपल्या ठिकाणी बरोबर होते.  कुठेतरी या सर्वाला तीच जबाबदार होती, याची तिला जाणीवही होती.चूक कोणाचीच नव्हती. मनीषा ला कळून चुकल  होते किती गुंता झाला आहे. आता हे सर्व तिलाच सांभाळुन घ्यायचे होते तेही कोणाला न दुखवता. संध्याकाळी मनीषा घर आवरत होती  तिचा विचार करणही चालूच होत.. तेवढ्यात पूर्वा तिथे आली. तिने विचारल, मी आवरू का? आता मनीषा बेचैन झाली , तिला पूर्वा ला स्पष्ट सांगायचे होते की हे सर्व इथेच थांबल पाहिजे गुंता वाढत जातोय  पण शब्द तिची साथ देत नव्हते. तिने पूर्व ला सांगितल चहा कर, आज आपण निवांत गप्पा मारत चहा घेऊ.....
      पूर्वा आणि मनीषा चहा घेत घेत गप्पा मारत होत्या. अचानक मनिषाने पूर्वा ला विचारल.... तुला अमित कसा वाटतो..? असा प्रश्न ऐकून पूर्वा  खरे तर दचकलीच.! तिला काय बोलावे ते कळतच नव्हतं. तिची एकूणच भावना पाहून मनिषाला समजलच होतं , पण तिला हे व्यवस्थित हाताळायच होतं. 'पूर्वा  आम्हा सर्वांनाच तू खुप आवडतेस. अमित , पिहू आणि मी.....  सर्वांचीच तू लाड़की बनली आहेस. आम्हाला तर तू आमच्या घरातील सदस्य वाटतेस , तू माझी "सख्खी मैत्रीण " आहेस. मला माहित आहे तुझाही जीव आमच्यात गुंतला आहे. तुही आमच्यावर तेवढच प्रेम करतेस जेवढ आम्ही करतो. पण माझा संसार मी तुझ्या सोबत वाटू नाही शकत.' मनीषा बोलत होती आणि पूर्वा च्या डोळ्यातून अश्रु वाहत होते.... ती काहीच न बोलता तिथुन निघून गेली. मनिषाला कल्पना होती पूर्वा ला काय त्रास होत असेल पण हे सर्व वेळीच बोलण गरजेच होत. दुसऱ्या दिवशी पूर्वा घरी आली नाही तेव्हा तिने तिच्या रूमकड़े पहिल, तीच्या रूम ला कुलुप होता आणि नंतर ते पूर्वा कधी उघडणारही नव्हती.

मनीषा काय झाल याचा फ़क्त विचार करत बसली......यापुढे तिचा संसार ती स्वता सांभाळनार होती.....!


.  

Thursday, 8 March 2018

"स्त्रित्वाचा जागर "

         आज जागतिक महिला दिन. सकाळपासूनच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हं ! अगदी आमदार झाल्यासारख वाटत आहे. या दिवशी दर वर्षी खुप शुभेच्छा मिळतात. स्त्री किती महान आहे हे आज सर्वांनाच प्रकर्षाने जाणवतं. आज उगाच अभिमान वाटायला लागतो स्त्री असल्याचा. बऱ्याच जणांचा याच्या वर वादविवाद चालतो कि स्त्रीत्वाचा सन्मान एकच दिवस का करायचा ? हे पण ठीक आहे. एकाच दिवशी कोडकौतुक करुन  वर्षभर " बाई  ची जागा पायाशी " असे महान विचार असणारे फ़क्त पुरुषच नाही तर अनेक स्त्रीया मी पाहिल्या आहेत. एकच दिवस का?  विचार तसा चांगलाच आहे.
               आपल्या वाढदिवसाच्या दिवशी खरं तर आपल्या आयुष्यातून एक वर्ष कमी झालेला असतो. तरीही आपण का साजरा करतो वाढदिवस? कदाचित येणाऱ्या आयुष्यात त्याने नविन उमेद घेऊन जगावं , भुतकाळ विसरुन चांगल भविष्य घडवावं. अगदी तसेच महिलांना चल आणि मूल यापुढे जाऊन स्वताला नवनवीन क्षेत्रात आजमावण्याची प्रेरणा मिळावी, भुतकाळ सोडून देऊन येणारं आयुष्य नव्या उमेदीने जगाव म्हणून तरी  हा दिवस साजरा  करावा. चूल -मूल  अन अख्खा संसार संभाळत, स्वत : पहिलेल स्वप्न पूर्ण करत ज्यांनी आपआपल्या  क्षेत्रात कर्तुत्व गाजवलं (एक स्त्री म्हणून मला पूर्ण जाणीव आहे हे करणं सोप नाही )त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांच्या "स्त्रीत्वाचा जागर" करण्यासाठी तरी असा एक दिवस नक्की साजरा करावा.
               माझ्या आयुष्यातील अनेक भूमिका  मैत्रीण , गुरु , हितचिंतक ,मार्गदर्शक ती चोख बजावत असते. जिने मला हे शिकावल की " कोणावर कधी अन्याय करू नको , आणि कधी अन्याय  सहनही करू नको". एक स्त्री म्हणून स्वताच अस्तित्व निर्माण करत असताना , तुझी कर्तव्य कधीच विसरु नको. जिच्यामुळे मी घडले त्या माझ्या आई ला माझा मानाचा मुजरा.!!!
            माझी  बहिण , मैत्रीण , गुरु , मार्गदर्शक , हितचिंतक, सहकारी  अशा अनेक भूमिकेत माझ्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक स्त्रीला त्यांना मिळालेल्या "स्त्रित्वा " साठी आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने  खुप खुप शुभेच्छा !!!




Stay Home🏡 Stay Safe