माझ्या प्रेमाची साक्ष ......
मी वाऱ्याला विचारल, देशील का रे माझ्या प्रेमाची साक्ष ?
तो म्हणाला माझ्या जवळ हजारो प्रेमाचे गंध आहेत.
लाखो भावना मी माझ्यात घेऊन चालत असतो.
त्यातल तुझ प्रेम नक्की कुठाल?
तुला ओळख असेल तर सांग मला.
हं ! अरे किती काळ लोटून गेला ,
मनातल्या भावना पुसटश्या झाल्या.
मला नाही सांगता येत , मी बोलून मोकळी झाले.
तो म्हणाला मग, वेडी ! हा कसला अट्टहास आहे तुझा ?
ज्या प्रेमाचा गंध तुझ्या जवळ आहे त्याचा आनंद घे.
ज्या सहवासात आनंद आहे तिथेच प्रेम आहे.
शोधू नको !
मग सांग मला ,
thank you sir..!
ReplyDelete