Mukta...मुक्ता :
१..
वाढदिवसासाठी खुप खरेदी करायची ...: १.. वाढदिवसासाठी खुप खरेदी करायची ठरली, खुप दिवसांनी बाहेर गेलो होतो . रात्री ११ पर्यंत खरेदी चालली आणि खुप उशीर झाला...
Wednesday, 16 October 2019
१..
वाढदिवसासाठी खुप खरेदी करायची ठरली, खुप दिवसांनी बाहेर गेलो होतो . रात्री ११ पर्यंत खरेदी चालली आणि खुप उशीर झाला म्हणून आम्ही परत निघालो. हलका हलका पाऊस पडत होता. गर्दी पण खुप होती , आम्ही गाडीवर घरी चाललो होतो. अचानक गाड़ी घसरली आणि आम्ही पडलो. बापरे ! काय अनुभव होता तो , मला उठताच येत नव्हत. एक क्षण मनात विचार आला आता मी कधीच उठु शकणार नाही..
मी ओरडत होते खुप मोठ्याने ,..... किंचाळत होते , मधेच अनंत ला आवाज द्यायचे. त्या वेदना मला अजूनही जाणवतात. आज साढे तीन महीने उलटून गेले पण ती घटना मनात घर करुन बसली आहे. मी जेव्हा जमिनीवर विव्हळत पडले होते तेव्हा वाटत होत, अमर भैय्या जसा आयुष्यभर उभा नाही राहु शकत..... तशीच कदाचित आता मी पण...... मी माझे विचार थांबवण्याचा खोटा प्रयत्न केला. कोणी तरी माझ्या डोक्याला हात लावून पाहत होत ,अनंत होता तो......तो पाहत होता माझ्या डोक्याला तर काही मार नाही लागला (कदाचित त्याला भीती वाटली असेल अधिच डोक्यावर पडलेली ती ,परत मार लागला तर त्याच काय होणार !). देव जाने कसे पण मला सुचल आणि मी डोक वर उचलून ठेवल. मी त्याला विचारल तुला लागल नाही न? आणि त्याला व्यवस्थित पाहून माझा जीव भांड्यात पडला.
कसबसे सर्वानि मला उचलून बाजूला बसवल तिथुन पुढे मला एवढच आठवत की मी अनंत ला म्हणत होते की मी रडणार नाही , हवा तेवढा त्रास सहन करते पण मला लवकर सांग की माझी पाठ मोडली नाही. असह्य वेदना होत होत्या , मला चार चार जण उचलून इथून तिथे तिथुन इथे आणत नेत होती माझ विव्हळन चालूच होत. शेवटी एक डॉक्टर आला अणि त्याने मला सांगितल की खुप जास्त काही झाल नाहीये तरी सकाळी हाडाचे डॉक्टर येतील अणि ते सांगतील तुम्हाला काय ते. मग काय त्यांनी सलाइन लावाले ,पेन कीलर दिल ...हे सर्व करता करता १ जुलै चा दिवस निघाला ... रात्री साधरण १२.३०-१.०० च्या दरम्यान अनंत नी घरी परत येताना माझ्या साठी घेतलेल गुलाबाच फूल जे अजूनही शाबूत आणि सोबत होत ते काढ़ल . डोक्यात प्रचंड विचार होते , आई ने मणक्याच्या आजारात काढलेले ते सहा महीने, भैय्या, अनंत...मी जर उठू शकले नाही तर अनंत काय करेल , आई पप्पा ,भैय्या आणि ...आणि मी डोळे बंद करुन सकाळाची वाट पाहु लागले..... या सर्व विचार कल्लोळात मला केव्हा झोप लागली कळलीच नाही...
Subscribe to:
Posts (Atom)
Stay Home🏡 Stay Safe
-
Sophisticated .. मोठ्यांदा खिदळन्याचा आवाज आला, आणि सर्वानी एकदाच वळून पहिल. सर्वजन 'हाउ ऐम्बर्रासिंग' अश्या अविर्भावात...
-
मुझे यकीन है अपने लफ्जों के हुनर पर..... के लोग मेरा चेहरा भूल सकते है . मेरी बातें नहीं ...... Hello all my lovely Frien...