मला वाटलं तू मला समजून घेशील
न संपणारं माझं बोलणं ऐकुन घेशील
माझं बेशिस्त मन तुला जास्त आवडेल
बाकी आकर्षणाला तू थोडी बगलच देशील
माझे किस्से ऐकताना तुझही मन उघडशील ,
मी तुझी होईन अन तू माझा होशील
स्त्री-पुरुष नात्यामध्ये चौकटी पडल्या किती
त्यातून तू मुक्त झाला, मलाही करशील
माझ्या स्वप्नांना नवं आभाळ देशील
मला वाटलं तू मला समजून घेशील
© सरला